

दर्पण न्यूज भिलवडी /पलूस प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदीप आप्पा कदम हे कामाचा माणूस असून त्यांना पक्षाकडून लवकरच मोठी जबाबदारी मिळणार आहे. याबाबतची आनंदाची बातमी कार्यकर्त्यांना लवकरच कळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापनाना पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पलूस येथे प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रतापनाना पाटील बोलत होते.
प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पलूस तालुक्यातील विविध गावांतील २७० महिला व तरुण कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला.
मेळाव्यात युवा व्याख्याते संदीप पाटील, संतोष कुडचीकर यांची प्रभावी भाषणे झाली. तसेच
डॉ. प्रतापनाना पाटील म्हणाले, “प्रदीप आप्पा हे जनतेसाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महिला व युवक मोठ्या प्रमाणावर पक्षात सहभागी होत आहेत. ही पक्षासाठी जमेची बाजू असून प्रदीप आप्पांच्या उज्ज्वल राजकीय भविष्याची नांदी आहे.”
प्रदीप आप्पा कदम यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या विचारधारेचा आढावा घेत कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन केले. ते म्हणाले, “समर्पण,संघर्ष आणि संकल्प यांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहीनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जपत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन लोकनेते अजितदादा यांना समर्पित.पलूस-कडेगाव तालुक्यात सुसंस्कृत राजकारण आणि विकासाचा विचार रुजविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू.”
संदीप कुडचीकर म्हणाले, “वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे प्रदीप आप्पा कदम. त्यांच्या कार्यामुळे केवळ पलूस-कडेगाव नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ‘पलूस फेस्टिव्हल’सारख्या उपक्रमांमुळे त्यांचे सामाजिक कार्य अधिक व्यापक झाले आहे.”
ॲड. संतोष जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “अनेक नेते निवडणुकीपुरते जनतेत दिसतात; मात्र प्रदीप आप्पा हे वर्षभर जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे नेतृत्व आहे. कोणतेही मोठे पद नसतानाही ते विकासकामे करत आहेत. भविष्यात मोठी जबाबदारी मिळाल्यास ते अधिक प्रभावीपणे जनतेची सेवा करतील.”
यावेळी अंकलखोप, धनगाव, भिलवडी, दूधोंडी, माळवाडी, नागठाणे, रामानंदनगर आदी गावांतील महिला व युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आशाताई गायकवाड, रूक्साना मुलाणी, रेणुका हिरेकर, विद्या मोहिते, शारदा चव्हाण, नजमा पठाण, वंदना, आलिया सय्यद, राजश्री कुंभार, मंजिरी शिंदे यांच्यासह अनेक महिलांनी पक्षप्रवेश केला.
गायत्री निकम यांनी यावेळी प्रभावी भाषण केले.
संजय शिंदे यांनी स्वागत केले, तर अभिजीत सावंत यांनी आभार मानले.
या मेळाव्यास शिक्षणरत्न बापूसाहेब पाटील, क्रीडारत्न पैलवान संभाजी जाधव, मुज्मील मुल्ला, सरिता कुंभार, अभिजीत कौलगे, तुषार सूर्यवंशी, महेश साळुंखे, अमीर पठाण, अनिल पाटील, उल्हास पाटील, कुलदीप वारे, सत्यजित पिसाळ, सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव, अवधूत साळुंखे, प्रसाद कांबळे, स्वप्नील जाधव, नारायण पाटील, राहुल पाटील, महेश हजारे, आशिष सूर्यवंशी, प्रदीप देवकुळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.