दर्पण न्यूज मिरज/सांगली -:सुविधा ग्रामपंचायतची वसुली मुंबई महापालिकेची आहे, असा घणाघात आरोप भीम आर्मीचे जैलाब शेख यांचा वाढीव घरपट्टी विरोधात केला आहे.
जैलाब शेख यांनी सांगितले की, भीम आर्मीच्या वतीने भांडवली मुल्य घरपट्टी त्वरित मागे घ्यावी व जुनी घरपट्टी पूर्वीप्रमाणे आकारावी अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच मिरज महापालिका क्षेत्रामध्ये एक लोकसभा खासदार दोन विधानसभा आमदार एक विधानपरिषद आमदार असून भांडवली मुल्य घरपट्टी संदर्भात लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.जनतेवर लावलेले कर जणू काय जिजा कर आहे कि काय?
जनतेने स्वतःहून जास्तीत जास्त हरकती दाखल करून स्वतः ची लढाई स्वतः लढावे कारण लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका झालेल्या आहेत.यावरुन असं स्पष्ट दिसत आहे कि लोक प्रतिनिधीना महापालिका क्षेत्रामध्ये जे भांडवली मूल्य घरपट्टी महापालिकेकडुन जनतेवर कराचा बोजा जबरदस्तीने लादली जातं आहे.
लोकप्रतिनिधी गप्प का??
असा सव्वाल जनतेने लोकप्रतिनिधीना करावा असे आवाहन भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जैलाब शेख यांनी प्रसार माध्यमातून केले.