दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार):- सांगली जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी वाहतूकीचा वाढता परिणाम लक्षात घेता सांगली विभागात मोठी कारवाई हाती घेण्यात आली आहे, सांगली जिल्ह्यातील विटा बस स्थानकात या बस स्थानकाच्या २०० मिटर परिसरात नो पार्किंग झोन लागू करत, काल पासून १५ जेन पर्यंत धडक कारवाई केली जाणार आहे, अवैध प्रवासी वाहतूकीमुळे एसटीच्या महसुलात मोठी घट होत असल्याचे वारंवार निदर्शनास आल्यानंतर ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेष बैठकीत याबाबत गंभीर दखल घेतली होती, त्यानंतर मुख्य सुरक्षा दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉ, प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे, या मोहिमेअंतर्गत विटा बस स्थानक परिसरात अनधिकृतपणे प्रवासी उचलणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जाणार असून नियम भंग करणाऱ्या वर विटा वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये बस स्थानक परिसरात कडक कारवाई केली जाणार आहे, असे वरील आलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे, सांगली विभागातील अधिकारी, व पर्यवेक्षक , आगार प्रशासन, आणि विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे स्थानिक वाहतूक पोलीस, यांच्या समन्वयाने अवैध वाहतूकीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, विटा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासह सांगली जिल्ह्यातील सर्व बस स्थानकात व परिसरात ही मोहीम राबवली जाणार आहे, बस स्थानकाबाहेर अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्यात घट होत असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व दिले जात आहे, एसटीचे उत्पन्न वाढविणे आणि प्रवाशांना सुरक्षित , अधिकृत सेवा अधिकृत उपलब्ध करून देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे, विटा उपविभागिय पोलीस अधिकारी विपूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी यांच्या सहकार्याने अवैध प्रवासी वाहतूकवर प्रभावी नियंत्रण आणले जाणार आहे,असे आव्हान सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री नंदकुमार पाटील, सुरक्षा निरीक्षक श्री बाबासाहेब पुजारी, श्रीमती सोनाली तामशेटे, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक,यांनी भेट देऊन आढावा घेतला, दरम्यान विटा पोलीस ठाणे अंतर्गत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी सह वाहतूक पोलीस,श्री,गळवे,देसाई, चव्हाण , सौ.चव्हाण गायकवाड,लाड, यांचेसह विटा आगार डेपो मॅनेजर श्री उदय पवार, व स्थानक प्रमुख श्री, रोहित गुरव, वाहतूक नियंत्रण निरीक्षक विनायक माळी, उपस्थित होते.
एसटीच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी वाहतूकीचा गंभीर परिणाम होत आहे, त्यामुळे बस स्थानक परिसरात २०० मिटर नो पार्किंग झोन, ची काटेकोरपणे अंमलबजावणी करुण अनधिकृत वाहतुकीवर आळा घालण्याचा आमचा प्रयत्न आहे, प्रवाशांनी अधिकृत एस.टी.सेवेचा वापर करावा ही नम्र विनंती आहे, तसेच स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि चालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,१५ जून पर्यंत सुरू असलेल्या या विशेष मोहिमेमुळे निश्चितच एस.टी.च्या उत्पन्नात वाढ होईल आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित व विश्र्वसनीय सेवा मिळेल ,असे आव्हान सुद्धा विटा आगार डेपोचे मॅनेजर श्री उदय पवार सर यांनी सांगितले.