

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार):-
स्वच्छ भारत अभियान- स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत, नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र भैय्या कांबळे,मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनखाली शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा पडणाऱ्या ठिकाणी विटा नगरपरिषद ने सातत्याने जनजागृती करत नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत. शहरातील गांधी चौक, मारुती मंदिर परिसर, गणेश पेठ, पॉवर हाऊस रोड, कराड रोड,बाबर गल्ली, ब्राम्हण गल्ली इत्यादी ठिकाणी रहिवाशी नागरिक व व्यावसायिक भागात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये याबाबत नोटीस दिलेल्या आहेत. तरीही काही बेजबाबदार नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत आहेत हे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने विटा नगरपरिषद आरोग्य वव स्वच्छ सर्वेक्षण विभागाच्या पथकाचे पहाटे 5 पासून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पथक तैनात केले वर ऑन स्पॉट दंडात्मक कारवाई केली आहे.
नागरिकांनी आपला घरगुती कचरा वर्गीकरण करून दररोज नगर परिषदेच्या घंटागाडी मध्ये द्यावा शहर स्वच्छतेसाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा पडू नये यासाठी पालिकेच्या वतीने रहिवासी व व्यावसायिक भागांमध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे शहरातील काही ठिकाणी अजूनही काही बेजबाबदार नागरिक कचरा टाकत आहेत त्यांच्यावरती पालिकेने दंडात्मक कारवाई करत कडक सूचना दिलेल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे असे प्रतिपादन यावेळी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी केले आहे
यावेळी स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे पथक प्रमुख शरद बोडरे,नितीन चंदनशिवे,अभि गायगवळे, सुरज मंडले, महेश झाडे,आकाश कदम, अभिजित ममदापुरे आदी उपस्थित होते.