दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
कळंब, दि. १० जून : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त कळंब तालुका अध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बांधणी तसेच जनतेच्या प्रश्नांवर पक्षाने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास कळंब पंचायत समितीचे माजी उपसभापती गुणवंत बप्पा पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशकाका टेकाळे, कळंब शहराध्यक्ष बाळासाहेब दादा कथले, ज्येष्ठ नेते मुस्सदिकभाई काझी, माणिकराव जाधव, संतोष पवार, जिल्हा सरचिटणीस भरत शिंदे, तालुका सचिव वाहेद पटेल, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष चेतन वाघमारे, युवक तालुकाध्यक्ष भिमा हगारे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष आफताब तांबोळी, विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस अतिष वाघमारे, संकेत नरवडे, लक्ष्मण शिंदे, राकेश तपकीर, आयुब पटेल, विलास तडाखे,तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पक्षाच्या २७ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत असताना प्रा.तुषार वाघमारे यांनी, पक्ष आज जरी सत्तेत नसला तरी एकूण 27 वर्षात निम्म्या पेक्षा जास्त वर्ष राज्यात व केंद्रात सत्तेच्या माध्यमातुन जणतेच्या सेवेत राहिलेला आहे, गोवा, ओडीसा, मेघालय, मनीपुर, नागालॅंड अशा अनेक राज्यातील कार्यकर्त्यांनी मंत्री, उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे संभाळल्या आहेत हे विसरता कामा नये. कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर बूथ बांधणी सारख्या उपक्रमांना विशेष महत्व दिले, जनतेचे प्रश्न मांडले, व लोकांसोबतच संवाद टिकवून ठेवला तर येणारा काळ निश्चित आपलाच असेल असे सांगितले. शिवाय जणता या जुमलेबाज सरकारवर तीव्र नाराज असून या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांसाठी आपण कार्यकर्त्यांनी प्रखर विरोध दर्शवत, जनतेच्या हिताची कामे पार पाडण्यासाठी तत्पर राहण्याचे अवाहन केले.
यावेळी सुरेश टेकाळे, माणिक जाधव, गुणवंत पवार आदींनी पक्षाच्या २७ वर्षांच्या प्रवासावा उजाळा दिला तर भीमा हगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.