दर्पण न्यूज कोल्हापूर :अनिल पाटील
राधानगरी तालुक्यातील तळाशी ग्रामपंचायतीच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. हे आरक्षण पंचायत समिती राधानगरीचे विस्तार अधिकारी लालासो मोहिते यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. ग्रामपंचायतीत एकूण तीन प्रभाग असून नऊ सदस्यांची निवड होणार आहे. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष तसेच सर्वसाधारण महिला व पुरुष अशा विविध प्रवर्गांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.
प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जाती महिला १ जागा, सर्वसाधारण महिला १ व सर्वसाधारण पुरुष १ जागा राखीव आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १, सर्वसाधारण महिला १ व सर्वसाधारण पुरुष १ जागा राखीव करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष १, सर्वसाधारण महिला १ व सर्वसाधारण पुरुष १ जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
एकूण आरक्षणात अनुसूचित जाती महिला १, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १, नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष १, सर्वसाधारण महिला ३ आणि सर्वसाधारण पुरुष ३ अशा नऊ जागांचा समावेश आहे.
यावेळी सरपंच बबन जाधव,, ग्रामसेवक दिलीप कांबळे,, सदाशिव चव्हाण,, रवी जाधव,, यशवंत राटोळ,, विजय जाधव आदी उपस्थित होते
आरक्षण सोडत जाहीर झाल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.