दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे उद्या आयोजित करण्यात आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) सभेला आंबेडकरी युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांचे विशेष स्वागत केले. यावेळी त्यांना आंबेडकरी विचारांचे पुस्तक आणि शाल भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक हक्क आणि तरुणांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला आंबेडकरी चळवळीतील तरुणांचा आणि विद्यार्थी संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत असून, उद्या होणारी ही सभा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.
या प्रसंगी डॉ. राहुल ससाणे, नितीन आंधळे, कुलदिप आंबेकर, नारायण चापके आदी प्रमुख मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्याच्या सभेत विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तरुण मोठ्या संख्येने एकत्र येतील, असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.