
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :-
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विटा शहरातील बस स्थानक व परिसरात स्वच्छतेबाबत नगरपालिकेने जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र भैय्या कांबळे यांच्या मार्गदर्शनखाली मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या आदेशाने आज विटा बस स्थानकातील प्रवासी व व्यावसायिकांच्या माध्यमातून जमा केलेल्या प्लास्टिक साठ्याचे संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात आला
विटा बस स्थानक परिसरातील सर्व व्यावसायिक दुकानदार फळ विक्रेते व नागरिकांना शहर स्वच्छतेबाबत कडक सूचना दिलेल्या आहेत. तसेच कंट्रोल रूमच्या माध्यमातून प्रवाशांना बसस्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी सूचना दिलेले आहे
यावेळी बोलताना आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे म्हणाले की बस स्थानक परिसरातील व्यावसायिकांनी स्वच्छतेबाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आपला परिसर स्वच्छ ठेवावा नगरपालिकेकडून आपणास ज्या सोयी सुविधा पुरवल्या जातात आहेत. आपण स्वच्छतेमध्ये आपले सक्रिय योगदान द्यावे आपल्या अडचणीसाठी नगरपालिका सदैव तत्पर आहे असे प्रभावी प्रतिपादन केले.
विटा बस स्थानकावर ती अस्वच्छता करणाऱ्यांवर नगरपालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे यासाठी एक स्वतंत्र पथक बस स्थानकावर तैनात केले आहे.
यावेळी विटा आगार प्रमुख उदय पवार साहेब, वाहतूक नियंत्रक श्री गुरव साहेब, श्री. संजय भिंगारदेवे (मेहरबान) श्री. नितीन चंदनशिवे सर , श्री सुरज मंडले, श्री अभि गायगवळे, श्री महेश झाडे, श्री आकाश कदम, श्री अभिजित ममदापुरे, श्री, बुद्धीवान आंबवडे, श्री विजय चंदनशिवे हे उपस्थित होते.