दर्पण न्यूज कागल :-
देशातील विविध क्षेत्रातील 150 मान्यवरांचा पैलवान सुभाष दादा पाटील युथ फाउंडेशन कडून गौरव
पैलवान सुभाष दादा पाटील युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पिंपळगाव बुद्रुक तालुका कागल यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय, युवा उद्योजक, पत्रकार, आरोग्य सेविका, कला क्रीडा, साहित्य कृषी अश्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या देशातील 150 लोकांचा युथ फाउंडेशन मार्फत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पैलवान सुभाष दादा पाटील संस्थापक अध्यक्ष युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, मा रंगराव पाटील साहेब ब्रॅंचपोस्ट मास्तर, मा भास्कर शेट्टे युवा नेते हातकणंगले विधानसभा , पैलवान अभिजीत तापेकर प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,माननीय बंडा लोंढे शिवसेना कोल्हापूर शहराध्यक्ष ,माननीय स्मिता राणी गुरव पंचायत समिती माजी सभापती कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ,माननीय संजय गायकवाड अध्यक्ष हर्षल फाउंडेशन देवळा संचालक हर्ष सृष्टी ऑल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, माननीय विजय पवार युवा उद्योजक शिक्षण क्षेत्र व कुणबी पाटील धुळे जिल्हा, माननीय विकास खतकर युवा उद्योजक हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी माननीय, उत्तम भाऊ जाधव स्पार्टन बॉईज भुदरगड तालुका अध्यक्ष तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांगोरे सर यांनी केले तर सूत्रसंचालन अभिजीत माने सर यांनी केले व आभार पैलवान सुभाष दादा पाटील यांनी मानले.