दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी(शिराज शिकलगार) :-
कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार आष्टा येथील सुप्रसिद्ध कवी अभिनेते डॉ.आनंद हाबळे यांना आमदार ,दलित मित्र डॉ.अशोकराव माने यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.
कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय लोककला महोत्सव व पुरस्कार वितरण समारंभ वाठार तर्फे वडगाव येथील चिंतामणी मंगल कार्यालय मध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
प्रास्ताविक व स्वागत कलाकार महासंघाचे राज्य अध्यक्ष अनिल मोरे यांनी केले त्यावेळी बोलताना ते म्हणाले डॉ.आनंद हाबळे यांनी गेल्या ४० वर्षात कला व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य उत्तम व कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच हा मानाचा राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
यावेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या कै. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचे सुपुत्र कैलास सावंत नारायणगावकर, तमाशा सम्राट विनोदवीर नितीन बनसोडे, सुप्रसिद्ध रील स्टार रवी सूर्यवंशी (दाजी), ऊसतोड कामगार मनीषा हजारे, कर्नाटकचे हिरो कै.पुनीतराज यांचे सुपुत्र शिवराजकुमार,सत्कार समिती अध्यक्ष बाळासाहेब गारे, सांगली जिल्हाध्यक्ष देवदास भंडारे, आदी मान्यवर व हजारो कलाकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.आनंद हाबळे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.