
दर्पण न्यूज विटा/प्रतिनिधी (शिराज शिकलगार):-
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी-महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारार्थ विटा येथील आदर्श इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी खानापूर-आटपाडी व पलूस-कडेगाव मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, विलास काळेबाग, आटपाडीचे नगराध्यक्ष यु. टी. जाधव, विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील, माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, भाजपचे खानापूर तालुकाध्यक्ष दाजी पवार, विटा नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते ॲड. अजित गायकवाड, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संग्राम माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक नियोजन, प्रचाराची दिशा, स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींसोबत समन्वय तसेच महायुतीच्या विजयासाठी करावयाच्या प्रभावी कामकाजावर सविस्तर चर्चा झाली. महायुतीची एकजूट, कार्यकर्त्यांची ताकद आणि लोकप्रतिनिधींचा विश्वास यांच्या बळावर धैर्यशील कदम यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.आगामी निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करत, महायुतीच्या विकासाभिमुख विचारांना अधिक बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.