
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार ) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा मायणी रोड या रोड लागत सूतगिरणीच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात व रस्त्याच्या कडेला झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना हाती घेत ट्री आर्मी या टीमची दमदार कामगिरी व आमदार सुहास भैया बाबर यांनी उचललेले पाऊल यास मतदारसंघातून व विटा शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे, पृथ्वी ही आपल्या सर्वांची आई आहे,, त्यामुळे तिची काळजी घ्यायची असेल तर प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आपण सर्वांना एक ना एक दिवस मातीतच जायचं आहे. त्यामुळे मातीची दोस्ती करा असे आवाहन करून आशा भोसले यांची जन्मभूमी असलेल्या सांगली जिल्ह्यात त्यांच्या नावाने मी इथे झाड लावत आहे हे माझे मोठे भाग्य आहे असे प्रतिपादन सिने अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी केले, ट्री आर्मी या उपक्रमाचा प्रारंभ गार्डी घानवड येथील सूतगिरणीच्या प्रांगणात जॉकी श्रॉफ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार सुहास बाबर, नगराध्यक्षा सौ काजल म्हेत्रे.उपनगराध्यक्ष अमोल बाबर, सभापती सुवर्णा भोसले, उपसभापती सुहास शिंदे, प्रांत अधिकारी विक्रम बांदल, खानापूर विटा तहसीलदार योगेश्वर टोंपे, विटा उपभागीय पोलीस उपअधीक्षक विपूल पाटील,पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे, नगरसेवक संजय भिंगारदेवे ,सह अन्य मान्यवर नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते, जॉकी सराफ म्हणाले ट्री आर्मी हा उपक्रम देशासाठी दिशादर्शक ठरेल, आमदार सुहास बाबर म्हणाले येत्या दोन वर्षात खानापूर मतदारसंघात ७८ हजार झाडे लावली जाणार आहेत, यावेळी फिरोज शेख, माजी नगरसेवक अमर शितोळे, रणजीत पाटील हेमंत बाबर, रामचंद्र भिंगारदेवे रोहित पाटील, शिंदे शिवसेनेचे युवा नेते श्रीधर जाधव, सरपंच संग्राम नलावडे, उपस्थित होते राहुल साळुंखे यांनी सर्व मान्यवर विटेकर नागरिक व सर्व नगरसेवक नगरसेविका व लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले.
————
सिने अभिनेता जॅकी श्रॉफ यांना कार्यक्रम स्थळी सजलेल्या बैलगाडीतून नेण्यात आले त्यावेळी व्यासपीठावर आगमन होण्याअगोदर जॅकी श्रॉफ यांनी स्टेजला प्रणाम केले, बळीराजाचे प्रतीक असलेल्या प्रतिकात्मक बैलगाडी भेट देऊन त्यांचा सत्कार केला, जॉकी श्रॉफ यांचे भाषण सुरू असताना अचानक स्टेजवरून त्यांची रस्त्याकडेला नजर गेली यावेळी भाषण थांबून त्यांनी कार्यकर्त्यांना विनंती केली की त्या मुक्या प्राण्याला व बैलगाडी धारकाला उन्हातून सावलीत घ्या अशी विनंती केली, विटा येथे आमदार सुहास भैया बाबर यांच्या निवासस्थानी सिने अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
——