दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय “महा-अधिवेशन २०२६” चे आयोजन रविवार, १४ जून रोजी करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे अधिवेशन पार पडणार असून राज्यभरातील ठेकेदार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे कार्याध्यक्ष बी. एस.पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
हे अधिवेशन महासैनिक दरबार हॉल व लॉन, सर्किट हाऊस रोड, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनामध्ये शासकीय ठेकेदारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा, प्रलंबित मागण्या, विकासकामांतील अडचणी तसेच संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर विचारमंथन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील ठेकेदारांनी या अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.