
भिलवडी : ऋषी भैय्या टकले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीजिल्ह्यात प्रथमच भारतीय जनता पार्टी चषक या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २ जूनपासून भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल २० संघांनी सहभाग नोंदवला आहे,
या स्पर्धेमुळे युवकांमध्ये खेळाची आवड, संघभावना आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. विविध संघांमध्ये रंगतदार सामने पाहायला मिळणार असून क्रिकेटप्रेमींमध्ये स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम पारितोषिक रुपये १,११,१११, द्वितीय पारितोषिक रुपये ७७,७७७, तृतीय पारितोषिक रुपये ३३,३३३ आणि चतुर्थ पारितोषिक रुपये ३३,३३३ असे ठेवण्यात आले आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहे .