दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा जनता विद्यालयात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत नलावडे होते. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती होती. बारावीच्या कला शाखेतून प्रथम आलेल्या बेदरे मनीषा नारायण 73.50%, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या ढोणे स्नेहा लक्ष्मण 63.50% तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या सोलवट शंभूराजे बाळासाहेब 63.17% या विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करण्यात आला. बारावीच्या विज्ञान शाखेमधून जमाले सुशांत बालाजी 64.67% याने प्रथम क्रमांक मिळवला असून गुळवे अमृता बाळासाहेब 61.83% द्वितीय तर जाधव श्रुती संताजी 60.% हीने तृतीय क्रमांक मिळवला आहे. दहावीच्या परीक्षेत हताळे अश्वस्थ नागनाथ 97.% याने प्रथम क्रमांक पटकावला असून हेमा प्रकाश सोनार 96%, हिचा दुसरा क्रमांक आला आहे. तर तवले संज्योत उद्धव 95.20% हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. पटेल तंजीला सलामत 92.80%, मुंडे स्नेहल रमेश 92%, भोसले सृष्टी सचिन 92%, भोसले श्रुतिका अजय 90.80% दिवाने प्रतीक्षा ,90.40% या विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत नेतृत्व दीपक कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या पालकांसह त्यांचा गौरव करण्यात आला. पालक श्री देवाने सर यांनी शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांवर शाळेने घेतलेल्या मेहनतीमुळेच हे यश मिळाले असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांमधून कुमारी प्रतीक्षा देवाने हीने आपले विचार व्यक्त केले. आपल्या गुणांमध्ये शाळेचा सिंहाचा वाटा आहे तसेच शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष दिल्यामुळेच या परीक्षेत चांगली कामगिरी करता आली असे मत तिने मांडले. यावर्षी बारावी कला शाखेचा निकाल 80.%, विज्ञान शाखा 85.29%तर दहावीचा निकाल 81.36%लागला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद जाधव यांनी केले तर आभार उपप्राचार्य कांबळे सर यांनी मांडले. याप्रसंगी पर्यवेक्षिका श्रीमती नाईक नवरे मॅडम तसेच सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.