

शिवराय, भिमराय व बसव यांच्या जयंती ; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार : ब्रेन स्पेशालिस्ट मानसोपचार तज्ञ डॉ विक्रमसिंह जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्दघाटन
दर्पण न्यूज कर्नाटक बेडकीहाळ :-
कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचा सर्वात मोठा सामाजिक उपक्रम मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा छ. शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थापक अध्यक्ष डॉ.विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ विक्रमसिंह जाधव ब्रेन स्पेशालिस्ट मानसोपचार तज्ञ मिरज, डॉ. शर्वरी विक्रमसिंह जाधव भारती विद्यापीठ प्रमुख मिरज यांच्या हस्ते करण्यात आले. छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अशोक जंगम उद्योजक जयसिंगपूर यांच्या हस्ते करण्यात आले. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अशोक नरुटे उद्योजक जयसिंगपुर यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. प्रकाश कदम प्रसिद्ध वक्ते कोगनोळी यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ युयुत्सु आर्ते सामाजिक कार्यकर्ते रत्नागिरी यांच्या हस्ते करण्यात आले. भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन बाळासाहेब पाटील बेडकिहाळ यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांनी केले. त्यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर 10 वी 12 वी मध्ये प्रथम द्वितीय तृतीय तसेच उत्तम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले. त्यावेळी डॉ सविता आहिरे उद्योजिका मुंबई, ॲड. निरंजन कांबळे नेज, ग्राम विकास अधिकारी प्रकाश धनगर, शेतकरी संघटना अध्यक्ष तात्यासाहेब केस्ते बेडकिहाळ उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक डॉ प्रकाश कदम सर म्हणाले की शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेली अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहे. रक्तदान शिबीर, महाआरोग्य शिबीराचे आयोजन, गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गरजु विद्यार्थ्यांचे शालेय फी भरणे, संगणक प्रशिक्षण मोफत देणे, गरजु महिलांना साड्या वाटप करणे, अनेक अनाथ आश्रमांना भेट देवुन अन्नधान्य, शालेय साहित्य, साड्या, आर्थिक मदत करणे, कवी संमेलन, मराठी साहित्य संमेलन भरवणे, व्रुक्षारोपण करणे, जेथे अन्याय होत असेल तेथे आंदोलन करणे गावातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी डॉ.विक्रम शिंगाडे नेहमी पुढाकार घेऊन कार्य करत असतात. तसेच सर्वात मोठा उपक्रम म्हणजे मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा दरवर्षी उत्साहात साजरा करत असतात असे अनेक उपक्रम ही संस्था राबवत असते. असे ते म्हणाले.
बाळासाहेब शिंदे म्हणाले की डॉ. विक्रम शिंगाडे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. असे मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे सोपे नाही. त्यांच्या सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी असु असे ते म्हणाले.
डॉ.विक्रमसिंह जाधव म्हणाले की डॉ.विक्रम शिंगाडे यांंचे कार्य सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे. डॉ विक्रम शिंगाडे यांच्या सारखे कार्य सर्वांनी केले तर समाजमध्ये नक्कीच प्रगती होईल. असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा.डॉ.अमर कांबळे म्हणाले की डॉ विक्रम शिंगाडे आज चार जोड्यांचे मोफत विवाह करुन देत आहेत. फक्त चार जोंड्यांचे नाही तर पाच लाख लोकांचे आशिर्वाद त्यांना लाभेल. आम्ही त्यांच्या संस्थेशी गेल्या सात आठ वर्षांपासून निगडित आहोत. त्यांचे सामाजिक कार्य खुप मोठे आहे.
तसेच सर्व जोड्यांना मार्गदर्शन करत म्हणाले की आज विवाहबंधनात अडकणार आहात तर सर्वांनी सुखात संसार करा. व आपल्या आईवडिलांना,पत्निला मानसन्मान द्या. आपल्या आईवडिलांचे, पत्नीचे आदर करा. असे ते म्हणाले.
अनेक मान्यवरांनी डॉ. विक्रम शिंगाडे यांच्या कार्याचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच त्यांच्या या मोठे सामाजिक कार्य करत असल्यामुळे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब केस्ते यांनी त्यांचा सत्कार केला. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये वधु वरांचे हिंदू विवाह पद्धतीने विधीवत कन्यादान करुन विवाह सोहळ्यामध्ये मंगळसूत्र, जोडवी, शालु वराला ड्रेस उपरणी संसार सट देवुन थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला.
त्यावेळी तात्यासाहेब केस्ते, संपत बोरगल,आस्मा कलावंत, अरुण यादव, तुषार कांबळे, सुधाकर माने, नेताजी गोरे, निलेश सनदी, अरुण कांबळे, सुशिल कांबळे, दिलिप कांबळे, आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम दि-19 रोजी देशभक्त रत्नाप्पाना कुंभार सभागृह बी एस कंपोजिट कॉलेज बेडकिहाळ येथे हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आभार ॲड.सुधाकर माने यांनी मानले.