दर्पण न्यूज पलूस/ भिलवडी :- सांगल जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
ज्येष्ठ संचालक रमेश सखाराम पाटील यांचे हस्ते ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वाचनालयाचे वतीने अभिवादन करण्यात आले . कार्यवाहक सुभाष कवडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व सार्वजनिक सत्य धर्माची संकल्पना विशद केली.
यावेळी जयंत केळकर यांनीही महात्मा फुले यांचे कार्य मनोगतात सांगितले. उपाध्यक्ष डी आर कदम विश्वस्त जी जी पाटील गुरुजी ग्रंथपाल मयुरी नलवडे मुख्य लेखनिक विद्या निकम सेवक माधव काटीकर तसेच वाचक बहुसंख्येने उपस्थित होते. आभार सुभाष कवडे यांनी मानले.