दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने एक एप्रिल 2026 रोजी आयोजित केलेला 76 वा वाचन कट्टा उत्साहात झाला .
या कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते प्रारंभी कार्यवाहक आणि वाचन कट्टा प्रमुख सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात मी वाचलेले संत साहित्य या विषयावर उपस्थितांनी आपले सादरीकरण करावे असे आवाहन केले.
यावेळी श्री ह. रा. जोशी सौभाग्यवती उर्मिला डिसले मयुरी नलवडे, रमेश चोपडे सर हनुमंतराव शिंदे डी आर कदम सर जयदीप पाटील भुना मगदूम जी जी पाटील आप्पा यांनी वाचलेल्या संत साहित्याचा मागोवा घेतला यावेळी संत जनाबाई संत तुकोबाराय संत एकनाथ अरविंद घोष यांच्या विषयी चर्चा करण्यात आली.
इंडियन एक्सप्रेस ग्रुपने देशभरातील शंभर कर्तबगार व्यक्ती व संस्थांची पुस्तिका तयार केली आहे .या पुस्तिकेत काकासाहेब चितळे व काकासाहेब चितळे फाउंडेशन यांचा समावेश आहे या पुस्तिकेतील मजकुराच्या प्रतिमेचे अनावरण या वाचन कट्ट्यावर करण्यात आले प्रारंभी मुकुंदराव चितळे डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यासह मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
गिरीश चितळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले . जयंत केळकर यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी अध्यक्ष गिरीश चितळे उपाध्यक्ष डी आर कदम कार्यवाह सुभाष कवडे विश्वस्थ जी जी आप्पा पाटील ग्रंथपाल मयुरी नलवडे सौ विद्या निकम माधव काटीकर यांच्यासह संचालक व वाचक बहुसंख्येने उपस्थित होते