

दर्पण न्यूज पलूस/भिलवडी:- जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी & सहेली व काकासाहेब चितळे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा पार पडल्या .
मा. गिरीश चितळे व भिलवडी पोलीस स्टेशनचे सहा.उपनिरीक्षक रोहिदास पावसे यांच्याहस्ते उदघाट्न करण्यात आले.
जायन्ट्सचे अध्यक्ष बाहुबली चौगुले यांनी मान्यवरांचे स्वागत केले.जि.प.प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री.मोहन गायकवाड साहेब यांनी स्पर्धेस सदिच्छा भेट दिली व भिलवडी सारख्या गांवात एवढ्या मोठ्या प्रमाणात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल जायन्ट्स ग्रुप,भिलवडीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. उपस्थित पालक वर्गानेही स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक केले.
बक्षीस वितरण समारंभ मा.मकरंद चितळे, नेत्रतज्ञ डॉ.सुहास जोशी, निखिल पाटील, देसाई सर, महावीर चौगुले या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.शितल किणीकर यांचे प्रथम क्रमांकचे बक्षीस देऊन मोलाचे सहकार्य लाभले.आभार सुबोध वाळवेकर यांनी मानले.कार्यकमात संभाजी महिंद, सचिन मगदूम, सुनिल ऐतवडे, सुनिल परीट, डॉ.सी. व्ही,कुलकर्णी, के. आर.पाटील सर, प्रदीप चौगुले व सहेलीच्या उज्वला परीट, स्मिता वाळवेकर,अश्विनी मगदूम,स्नेहा शेडबाळकर व सर्व मान्यवर सभासद उपस्थित होते.
स्पर्धेचे पंच दीपक वायचळ,नाझिया पटेल व संतोष रामचंद्रे होते.
*खुला गट*
1.मुद्दसर पटेल
2.संतोष सर्रीकर
3.अभिषेक पाटील
*U15*
1.आदित्य चव्हाण
2.अथर्व तावरे
3.श्रेणिक देसाई
*U 12*
1.श्वेतांक होवलं
2.पृथ्वीराज पाटील
3.अन्वय पाटील
*बेस्ट भिलवडी*
1.श्रीवर्धन चौगुले
2.पार्थ शिंदे
3.राजवर्धन चौगुले
*55 च्यावर*
1.दिलीप कुलकर्णी
2 दिनेश पोतदार
3.संगीता पोतदार