दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने) :-
येडशी – येथील जनता विद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या गणित विज्ञान व इंग्रजी ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून विद्यालयातील 14 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्राप्त झाली आहेत.
इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड IEO यात 9 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके प्राप्त केली असून त्यात कु. प्रांजली पवार कु.प्रतीक्षा दिवाने कु.स्नेहल सायगुंडे कु.नम्रता शिनगारे चि.शौर्य कांबळे कु.तेजस्विनी ओव्हाळ कु.श्रुती जाधव कु.प्रनिषा सावंत आणि सुशांत जमाले या विद्यार्थ्यांचा समावेश असून नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड NSO या परीक्षेत 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावले आहेत त्यात कु.श्रुतिका भोसले कु.अक्षता जाधव कु.श्रुती जाधव कु.शितल गाढवे आणि कु.सृष्टी दिवाने यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा आज विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा विकास परिषदेचे सरचिटणीस प्रा.अर्जुन जाधव सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत नलावडे सर होते. पालक प्रतिनिधी म्हणून श्रीमती दिवाने मॅडम यांनी या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळविल्याबद्दल मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. व्यासपीठावर उपप्राचार्य कांबळे सर पर्यवेक्षिका नाईकनवरे मॅडम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांची उपस्थिती होती. याप्रसंगीऑलिम्पियाड परीक्षेचे समन्वयक राहुल कांबळे सर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कांबळे सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.