भिलवडी येथे आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या आदेशाचे पालन ; काँग्रेस उमेदवारांकडून प्रचार ; ज्येष्ठ नेते, युवक सक्रिय



दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस :- नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत इच्छुक उमेदवारांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, हायकमांड माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून प्रतिक पाटील, हजराबी सलामत, शोभा हजारे यांची उमेदवारी निश्चित झाली. त्यानुसार आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या आदेशाचे पालन करीत भिलवडी येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, युवक सक्रिय सहभाग घेऊन प्रचार करीत आहेत.
भिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून प्रतिक पाटील, पंचायत समिती गण भिलवडी कडून हजराबी सलामत, पंचायत समिती गण वसगडेकडून शोभा हजारे यांची उमेदवारी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी जाहीर केली. काँग्रेस पदाधिकारी,उमेदवार आणि युवकांनी लोकतिर्थ येथे स्व डॉ पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे दर्शन करून मोर्चेबांधणी करून प्रचार सुरू केला आहे. भिलवडी येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भिलवडी जिल्हा परिषद गटातील उमेदवार आणि पंचायत समिती गणातील उमेदवार यांना निवडून आणावे यासाठी गेले तीन चार दिवस झाले गाव आणि वाडी वस्त्यांवर प्रचार करीत आहेत. प्रचारा दरम्यान, माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी दिलेले आणि जाहीर केलेले उमेदवार यांचाच आम्ही प्रचार करीत आहोत. आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या आदेशाचे पालन करून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून आपणही सहभागी व्हावे सहकार्य करावे, असे आवाहन लोकांना ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते ,युवक करीत आहेत. या प्रचारामध्ये मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नक्कीच भिलवडी जिल्हा परिषद गटात आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या आदेशाचे पालन होत आहे.



