

दर्पण न्यूज मिरज/ सांगली -: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची महासभा झाली. या महासभेत स्थायी समिती महिला बालकल्याण आणि समाज कल्याण समितीच्या सदस्य पदी अनेकांची निवड झाली.
मिरज येथील नगरसेवक गणेश दादा माळी यांची स्थायी समिती सदस्य पदी निवड झाली. श्रीमती बानु मुसा जमादार यांची महिला बालकल्याण समितीच्या सदस्य पदी निवड झाली. सौ उज्वला ताई कांबळे यांची समाजकल्याण समितीच्या सदस्य पदी निवड झाली. या निवडीबद्दल
मा. फारुक मुसा जमादार
प्रदेश सचिव, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा, महाराष्ट्र राज्य यांनी वरील नगरसेवक यांचे अभिनंदन केले आहे.