महाराष्ट्रराजकीय
जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज मिरज / सांगली : राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील हे रविवार, दिनांक 1 मार्च 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता बेळंकी हेलिपॅड ता. मिरज येथे आगमन व मोटारीने म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना अंतर्गत बोगदा कार्यस्थळाकडे प्रयाण. सकाळी 11 40 वाजता म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना अंतर्गत बोगदा कार्यस्थळ येथे आगमन व बोगदा ब्रेकथ्रू समारंभ व पाहणी करिता राखीव, स्थळ – बेळंकी. दुपारी 1.50 वाजता बेळंकी हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता बेळंकी हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने बीडकडे प्रयाग.



