भाजपाच्या प्रभाग क्रमांक 20 च्या उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करा : आमदार सुरेश खाडे : मिरज कृष्णाघाट येथे योगेंद्र थोरात, सुनील गवळी, तृप्ती कांबळे यांचा प्रचार ; विकासकामांच्या पुस्तकाचे प्रकाशन
मिरज कृष्णाघाट येथे प्रभाग क्रमांक 20 च्या उमेदवारांना वाढता पाठिंबा








दर्पण न्यूज मिरज (मुख्य संपादक अभिजीत रांजणे):- सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये विकास काम बोलत आहे. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी वार्ड क्रमांक 20 मोठी विकासकामे केली आहेत. या प्रभागासह इतर सर्व प्रभागांच भाजप विकासाची गंगा आणणार आहे. त्यामुळे मतदार बंधू भगिनी यांनी भाजपच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार सुरेश खाडे यांनी केले.
ते मिरज कृष्णाघाट येथे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 20 चे भाजपाचे उमेदवार योगेंद्र थोरात,सुनील गवळी,तृप्ती कांबळे यांच्या प्रचारासाठी आणि विकासकामांच्या पुस्तकीचे प्रकाशन प्रसंगी बोलत होते.आमदार सुरेश खाडे यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक 20 मध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, मुख्याध्यापक सुनील गवळी, उद्योजिका तृप्ती कांबळे यांना भाजपची उमेदवारी दिली आहे. या उमेदवारांना लोकांच्या अडीअडचणींची जाणीव आहे. या प्रभागाचा हे उमेदवार नक्कीच कायापालट करतील. माझेही सहकार्य राहील. त्यामुळे यांना निवडून आणावे, असे आवाहन आमदार सुरेश खाडे यांनी केले.
यावेळी उमेदवार माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सांगितले की, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, मी प्रभाग क्रमांक 20 मध्ये विकास केला आहे. हे विकास पुस्तक पाहिल्यानंतर आपणास कळेल. येत्या 15 जानेवारीला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा तिघा भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यावे .या प्रसंगी प्रभाग क्रमांक 20 मधील भारतीय जनता पक्षाचे योगेंद्र थोरात,सुनील गवळी,तृप्ती कांबळे उपस्थित होते. तसेच महेंद्र थोरात, दीपक कांबळे, भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



