महाराष्ट्रराजकीय
पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप व अंतिम मतदार याद्यांच्या प्रसिद्धीच्या तारखेत बदल

दर्पण न्यूज पुणे :- पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याच्या सुरू असलेल्या कार्यक्रमात भारत निवडणूक आयोगाने सुधारणा केली असून याअंतर्गत प्रारूप मतदार याद्यांच्या प्रसिद्धीचा दिनांक ३ डिसेंबर २०२५ आणि अंतिम मतदार याद्यांच्या प्रसिद्धीचा दिनांक १२ जानेवारी २०२६ असा करण्यात आला आहे, असे विभागीय आयुक्तालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांनी कळविले आहे.
उपसंचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला,
ससून रुग्णालयासमोर, पुणे-411 001
दूरध्वनी: 020/26123435


