महाराष्ट्रराजकीयसामाजिक
मालगाव- सुभाषनगर येथे उद्योगपती सी आर सांगलीकर यांचा वाढदिवस साजरा
मालगाव- सुभाषनगर येथील दिलासा भवन येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप


दर्पण न्यूज मिरज :-
दानशूर व्यक्तिमत्व, दीनदलितांचे कैवारी, धम्मभूमी गुगवाडचे संस्थापक उद्योगपती सी आर सांगलीकर यांचा वाढदिवस मालगाव- सुभाषनगर येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त मालगाव- सुभाषनगर येथील दिलासा भवन येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी मालगाव सरपंच अनिता रविंद्र शिरसागर, मिरज तालुका काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संघापांना पाटोळे, मालगाव चे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिरसागर, बाळासाहेब शिंदे, शशिकांत गायकवाड,
दर्पण न्यूज चे संपादक, पत्रकार अभिजीत रांजणे, सी आर सांगलीकर फाउंडेशनचे अविनाश जाधव आदी उपस्थित होते.


