भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल, भिलवडी येथे आजी-आजोबा दिन उत्साहात

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल, भिलवडी मध्ये, रविवार दि.*१४ सप्टेंबर २०२५ रोजी आजी-आजोबा दिन उत्साहात करण्यात आला.
आजी-आजोबा हे कुटुंबाचा सर्वात मोठा खजिना आहेत, प्रेमळ वारशाचे संस्थापक, कथाकार आणि परंपरेचे रक्षक आहेत. ते त्यांच्या विशेष प्रेम आणि काळजीद्वारे कुटुंबाला हृदयाच्या जवळ ठेवतात.
असं म्हणतात, नातवंड हे आजी आजोबांचे शेवटचे मित्र असतात व नातवंडांचे ते पहिले मित्र .
आजी आजोबांसाठी नातवंडांच्या शाळेतील हा दिवस संस्मरणीय ठरावा म्हणून आमच्या विद्यार्थ्यांच्या आजी आजोबा करीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शिक्षकांनी आजी-आजोबांच्या मेळाव्याला संबोधित केले आणि आपल्या जीवनात आजी-आजोबांची भूमिका स्पष्ट केली . सिनियर के.जी. वर्गातील लहान मुलांनी “दादाजी की छडी हू मै” या गाण्यात चमकदार सादरीकरण केले. शिक्षकांनी विसाव्या शतकातील आजी ते एकविसाव्या शतकातील आजी या नाटकात काम केले.
सर्वांनी शाळेने आयोजित केलेल्या खेळांमध्ये मनापासून सहभाग घेतला आणि बक्षिसे मिळवली.
त्यापैकी काहींनी या कार्यक्रमांद्वारे पिढीमध्ये संबंध निर्माण करण्याच्या त्यांच्या विचारांचे आणि प्रयत्नांचे कौतुक केले आणि शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या . शेवटी सर्वांना एक चविष्ट अल्पोपहार देण्यात आला.
यावेळी संस्थेचे संचालक या.श्री. अजय चौगुले सर, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका मा. सौ. स्मिता माने टिचर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व यामध्ये आजी- आजोबांची उपस्थिती लक्षणीय होती .
खरोखरच हा “आजी-आजोबा दिन” एक संस्मरणीय आणि आनंददायी कार्यक्रम होता.