दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :–
येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे- अक्षय चव्हाण, स्वप्निल पौळ, शिवाजी जाधवर, चैतन्य येलकर, निखील काळे, शुभम शिंदे, प्रतिक लोकरे, महादेव घुले, अनिकेत उकंडे, यश माने, कृष्णा कचरे, अभी सुरवसे, रविकिरण जाधव, तुषार वाघमारे, समाधान घोलप, किशोर कदम, कृष्णा कदम, सुनिल सुनिल उकरंडे, शरद माने किशोर धावारे, पांडु जाधवर, बालाजी हलकरे, किशोर इदगे, बापु धावारे, महाराज येलकर,प्रोमद घोलप, रणजित लुगडे, निखील काळे,नाना घुले, अमोल कल्याण वाघमारे,बालाजी मोहिते, तन्मय नाना घुले, अक्षय भगवान पौळ,अक्षय बालाजी घुले, गोटु घुले, लखन बिभीषन खामकर, स्वप्निल खामकर, ओमराज नाना घुले, सुरज घुले, रोहीत घुले, नितीन मस्के, गणेश घुले, मांडवकर भैया, राजेंद्र वाघमारे, हर्षद सरवदे व इतर 35 इसम यांनी दि.02.08.2026 रोजी 23.00 ते दि.03.08.2026 रोजी 05.00 वा. सु. बसस्थानक चौक तेरखेडा येथे नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जुन्या भांडणाच्या रागातुन एकमेकांना लाकडी काठ्यांनी मारहाण केली व एकमेकांचे दिशेने दगड फेकले सदर दगडफेक व काठीने मारहाण ही जिवीतास अत्यंत धोकायदायक स्वरुपाची होती. पोलीस अधिकारी व कर्मचारी हे शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांचे म्हणणे नएकता हाणामारी व दगडफेक सुरु ठेवून शासकीय कर्तव्याच्या कामात अडथळा निर्माण केला,सरदवेळी कामकाज करत असलेले अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर लोकांवर प्राणघातक हल्ला करुन नागरिकांचे जिवीतास धोका निर्माण करणरे कृत्य करुन कायदा व सुयव्यवस्थेचा प्रश्न निमार्ण करुन सपोनि यशवंत घोडके,येरमाळा पोलीस ठाणे, राजेंद्र कल्याण वाघमारे, बालाजी मोहिते, सुरज धुले, अमोल वाघमारे, हर्षद सरवदे, यश माने, राजकिरण जाधव सर्व रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांना किरकोळ व गंभीर जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रणजित संभाजीराव गाडे, पोलीस हावलदार नेमणुक पोलीस ठाणे येरमाळा यांनी दि.04.08.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे येरमाळा येथे भा.न्या.सं.कलम 109,(1), 110, 132, 121, 189(2), 190, 191(2), 194, 125, 195, 118(1), 115(2),351(2), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
