सांगली जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने जागतिक सहकार दिनानिमित्त वृक्षारोपण

दर्पण न्यूज भिलवडी : सांगली जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने जागतिक सहकार दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व केंद्र शासन स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापनाला चार वर्षे पूर्ण झाले.यानिमित्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली व जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि, सांगली यांचे संयुक्त विद्यमाने वसगडे येथील जयभारत हायस्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारच्या वृक्ष लावण्यात आली. राज्य फेडरेशन महासचीव मुख्याध्यापक शशिकांत राजोबा म्हणाले, शासनाच्या एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केलेली झाडे मुलांच्या आईची नावे देऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. शाळेची पावणेदोन एकर ची जागा हरितसृष्टीने समृद्ध करण्यात आली आहे.
अनिल कोळी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सांगली गणेश काटकर अधीक्षक, सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक कार्यालय आधिकारी सांगली जिल्हा फेडरेशनचे चेअरमन ए डी पाटील व्यवस्थापक अनिल मांगले संस्थेचे अध्यक्ष रामदादा पवार सरपंच वृषाली काशीद, शोभाताई हजारें,अनिल पाटील,अमोल राजगोंडा पाटील आदी उपस्थित होते.