डायटच्या प्राचार्यपदी डॉ विजय सरगर यांची निवड

दर्पण न्यूज सांगली प्रतिनिधी: सांगली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) प्राचार्यपदी डॉ विजय सरगर यांची नवनियुक्ती करण्यात आले बद्दल सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेकडून स्वागत व सत्कार करण्यात आला.सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सरचिटणीस प्रा दिलीप जाधव यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.त्यांच्या नियुक्तीस शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ सरगर यांनी या शैक्षणिक वर्षापासून येणारी प्रशिक्षणे, नवीन शैक्षणिक धोरण, शासकीय पथक पर्यवेक्षण, विविध उपक्रम यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा सहभाग घेतला जाईल.व
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वाशित केले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा सुरेश भिसे, उपाध्यक्ष पी व्ही जाधव , उपप्राचार्य धनपाल यादव, सहसचिव प्रा वर्धमान भिलवडे, प्रा नागरगोजे, सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे सरचिटणीस प्रा सुनील गवारी,प्रा सुभाष पाटील, प्रा महादेव ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.