आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सांगली : इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश  30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन  

 

 

        सांगली  : इतर मागास बहुजन कल्याण विभागमहाराष्ट्र राज्य विभागामार्फत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना एस. के. इंटरनॅशनल स्कूलरेठरेधरण ता . वाळवा आणि डॉफोडील इंग्लिश मेडियम स्कुलउमदी ता.जत जि. सांगली या निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली ते 12 वी मोफत शिक्षण देण्यासाठी सन 2024-25 मधील इयत्ता 1 ली ते 5 वी च्या प्रवेशाकरीता सांगली जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत विनाशुल्क प्रवेशासाठी संबंधित निवासी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे दि. 30 जूनपर्यंत संपर्क साधून अर्ज सादर करावाअसे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सांगली कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

             प्रवेशाच्या इयत्ता 1 ली ते  5 वी करीता योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे.  प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी धनगर समाजाचा असावा (जात प्रमाणपत्र दाखला सादर करणे आवश्यक)जर विद्यार्थी दारिद्रयरेषेखालील असेल तर त्यासंबंधीच्या यादीतील अनुक्रमांच्या नोंदीसह दाखला आवश्यकमुलांच्या पालकांच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख रूपये इतकी राहील.

        अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालकइतर मागास बहुजन कल्याणसांगली यांचे कार्यालयडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगांव रोडसांगली यांच्याकडे संपर्क साधावाअसे आवाहनही करण्यात आले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!