क्रीडा
भिलवडी येथे व्यापारी संघटना भिलवडी च्यावतीने 15 रोजी भव्य होडी स्पर्धा

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील कृष्णा नदी पात्रात व्यापारी संघटना भिलवडी च्यावतीने गुरूवार दिनांक 15 रोजी दुपारी 3 वाजता भव्य होडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
भिलवडी कृष्णा नदीचं पात्र अन् किनारी असणारा दगडी घाट, हिरवीगार हिरवळ , संत वाहणाऱ्या कृष्णामाईतील भव्य होडी स्पर्धेचा प्रत्यक्ष नयनरम्य अनुभव घेण्यासाठी सर्वांनी मिळून या, असे आवाहन व्यापारी संघटना भिलवडी च्यावतीने करण्यात आले आहे.