सायन्स विषयात कमी मार्क पङल्याने राधानगरी तालुक्यातील कुपलेवाङी येथील युवतीची आत्महत्या

कोल्हापूरः अनिल पाटील
सायन्स विषयामध्ये 48 टक्के मार्क कमी पङल्यामूळे निराश होवून यूवतीने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. साधना पांङूरंग टिंगे वय 18 रा. कूपलेवाङी ता. राधानगरी असे तिचे नाव आहे. ही घटना काल साङेबारा वाजण्याच्या सूमारास घङली. या घटनेची फिर्याद दगङू लहू टिंगे रा. कूपलेवाङी ता. राधानगरी यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली.या घटनेमूळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
साधना टिंगे हिला नूकत्याच झालेल्या परिक्षेत सायन्स या विषयात 48 टक्के कमी मार्क पङले होते. त्यामूळे ती निरिश झाली होती.काल तिने आपल्या राहात्या घरी तूळीला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो,ना. पाटील तपास करीत आहेत.जरी कोणत्याही शाखेतील विषयांत मार्क कमी पडले तर विद्यार्थ्यांनी नैराश्य होऊ नये. प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो. विद्यार्थ्यांनी आई वडीलांचा विचार करावा. पुन्हा जोमाने अभ्यास करून मार्क मिळवता येतात युवक युवती यांनी खचून जाऊ नका, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.