आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञान

माइन्डसेट बदलून माणूस आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकतो ; आनंदश्री प्रा. डॉ. दिनेश गुप्ता

मानसिकता उपचार व मोबाईल डी एडिक्शन’ ची सुरुवात

 

दर्पण न्यूज कल्याण मुंबई :-:१२ मे २०२५ (बुद्ध पौर्णिमा):
बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून आनंदश्री प्रा. डॉ. दिनेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माइन्डसेट क्युर क्लिनिक’ ची भव्य सुरुवात करण्यात आली. हे केंद्र कल्याण पश्चिमेतील श्री महावीर जैन शाळेसमोर, आदर्श टायपिंग क्लासवर, मधुरा न्यूट्रिशन सेंटर येथे सुरू करण्यात आले आहे.

डॉ. गुप्तांच्या मते —
“अनेक मानसिक आणि वैयक्तिक समस्या आपल्या अंतरमनात दडलेल्या असतात. जेव्हा आपण आपला माइन्डसेट बदलतो, तेव्हा आपले आयुष्यही सकारात्मकपणे बदलते.”

या क्लिनिकमध्ये खालील सेवा उपलब्ध असतील:
मानसिक समुपदेशन व मार्गदर्शन
अभ्यास व करिअर कोचिंग
मोबाईल/डिजिटल व्यसनमुक्ती
आत्मविश्वास वाढवणे
फोबिया, रिलेशनशिप इश्यूज
मानसिक तणाव, न्यूनगंड व माइंड डिसऑर्डर

माइंड रीप्रोग्रॅमिंग व वैयक्तिक विकासासाठी सायंटिफिक पद्धती

प्रा. डॉ. दिनेश गुप्ता यांनी आजवर सुमारे पाच लाखांहून अधिक विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, महिला, पत्रकार व उद्योजकांना प्रेरणा व मार्गदर्शन दिले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवांवर आधारित जगातील पहिले माइन्डसेट क्युर क्लिनिक कल्याणमध्ये उभे करण्यात आले आहे.

सुरुवातीच्या काळात मर्यादित काळासाठी मोफत समुपदेशन सेवा उपलब्ध आहे. इच्छुकांनी व्हॉट्सॲप 8007179747 या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करावी.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!