सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे बस्तवडेकर यांच्या वतीने मुरगूडचे सेवा निवृत्त शिक्षक एम. आर. बेनके यांना शुभेच्छा

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):- *सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड स्थापनेपासून हिंदी विषयाचे प्राध्यापक तसेच सुरुवातीस महाविद्यालयामधील विद्यार्थी बैठक व्यवस्था, तासांचे वेळापत्रक, त्याचे सर्व ऑफिस कार्यालयामधील कामकाज व सुरुवातीला ग्रंथालयाचे सुद्धा रजिस्टर नोंद व पुस्तक देवघेव , परीक्षा विभागाचे असे पडेल ती जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडणारे तसेच सर्वांना बरोबर अतिशय चांगल्या प्रकारे सुसंवाद ठेवणारे असे आमचे सन्माननीय प्राध्यापक एम. आर. बेनके सर हे दीर्घकाळाच्या सेवेनंतर वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देताना सामाजिक कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य साताप्पा कांबळे बस्तवडेकर, सामाजिक कार्यकर्ते व आश्रम शाळा चिमगाव येथील डी.एम. वनिक सर , संजय भारमल मुरगुड व सदाशिव जयसिंग गिरी बुवा करंजीवणे आदी उपस्थित होते.