ताज्या घडामोडी
भिलवडी येथील श्रीमती मालनदेवी पाटील यांचे निधन

भिलवडी;-सांघली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील लोकनेते कै बाळासाहेब काका पाटील यांच्या पत्नी, तसेच वसंतदादा कारखान्याचे संचालक राजू दादा पाटील आणि माजी जि.प.सदस्य संग्राम दादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती मालनदेवी बाळासाहेब पाटील (वय ८२) यांचे आज रविवार दिनांक २१ रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले..
अंत्यसंस्कार विधी सकाळी 11 वाजता भिलवडीच्या कृष्णा घाटावर झाला. रक्षाविसर्जन कार्यक्रम मंगळवार दिनांक 23 रोजी सकाळी 9:30 वाजता भिलवडी येथे आहे.