हुपरी पोलिस ठाण्याचा सहाय्यक फौजदार दिलीप योसेफ तिवङे याला 9 हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकङले रंगेहाथ .

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार व त्यांच्या शेजारी राहत असलेल्या शेजारी यांचे कुत्रा चावले या कारणावरून तक्रारदार आणि त्यांचा मुलगा यांच्यावर एकमेकावर गुन्हा दाखल असून त्यामध्ये तक्रार दार आणि त्यांच्या मुलाला अटक न करण्यासाठी व गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी आरोपी हूपरी पोलिस ठाण्याचा सहाय्यक फौजदार दिलीप योसेफ तिवङे वय 52 रा. कदमवाङी जिल्हा कोल्हापूर यांनी तक्रारदार यांच्याकडे 10,000/- ₹ लाच रक्कम मागणी करून तडजोडीअंती 9,000/-₹ लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध हुपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बापू साळुंके,पोलीस निरीक्षक श्रेणीपो उप नि बंबरगेकर,पोहेकॉ/घोसाळकर,पोना/सचिन पाटील,मपोकॉ/पुनम पाटील चापोहेकॉ/विष्णु गुरव,चापोहेकॉ/सुरज अपराध ला.प्र.वि.कोल्हापूर. यांनी सापळा लावून केली.