पलूस येथे भारत पेट्रोलियम मॅक ऑइलचा उच्चांकी व्यवसाय करेल : कुमार नंदन
जब्बार मिस्त्री यांच्या साई ऑटो मध्ये भारत पेट्रोलियमच्या मॅक ऑइल चे लॉन्चिंग

पलूस: पलूस येथे भारत पेट्रोलियम तर्फे जब्बार मिस्त्री यांच्या साई ऑटो मध्ये भारत पेट्रोलियमच्या मॅक या ऑईल चे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी भारत पेट्रोलियम चे वेस्टर्न विभागाचे प्रमुख कुमार नंदन यांच्या हस्ते फीत कापून मॅक ऑइल चे लॉन्चिंग करण्यात आले. पलूस परिसरामध्ये भारत पेट्रोलियम मॅक ऑइल चा उच्चांकी व्यवसाय करेल असा विश्वास भारत पेट्रोलियम चे अधिकारी कुमार नंदन यांनी व्यक्त केला. भारत पेट्रोलियम 20 देशांमध्ये ऑइल ची निर्यात करते असेही ते म्हणाले. पलूस विटा येथे भारत पेट्रोलियम च्या वतीने मॅक ऑइल चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी जब्बार शिकलगार, मॅनेजिंग टेरिटोरी मॅनेजर वीरेंद्र गौतम, डेव्हलपमेंट बिझनेस मॅनेजर निलेश करपे, मार्केटिंग एरिया मॅनेजर नितीश दुबे, किरण कुलकर्णी, मुलाणी सर,विशाल तिरमारे मनसूर मुजावर,एडवोकेट मोहन शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे म्हणाले, पलूस शहरासह परिसरामध्ये जब्बार शिकलगार यांचे फोर व्हीलर दुरुस्ती मध्ये नाव आहे. कमी वेळेत कमी खर्चामध्ये फोर व्हीलर दुरुस्ती चे चांगल्या पद्धतीचे काम ते करतात. त्यामुळे भारत पेट्रोलियम ला सोन्याचे अंडी देणारी कोंबडी जब्बार मिस्त्रींच्या माध्यमातून भारत पेट्रोलियम ला मिळाली आहे. तुमच्या मॅक ऑइल ला नक्कीच आम्ही पसंती देवू आणि भारत पेट्रोलियम चा व्यवसाय साई ऑटो च्या माध्यमातून वृद्धिंगत होईल. भारत पेट्रोलियम ने आजवर नागरिकांची सेवा केली आहे.
यावेळी फोर व्हीलर धारकांच्या वतीने भारत पेट्रोलियम चे चार राज्यांचे मुख्य लुब्रिकंट वेस्टर्न रिजन चे कुमारनंदन,जब्बार शिकलगार मिस्त्री,यांचा सत्कार अख्तर पिरजादे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांचा तसेच सर्व मान्यवरांचा सत्कार साई ऑटो फर्म च्या वतीने करण्यात आला. यावेळी वीरेंद्र गौतम आणि निलेश करपे यांनीही मनोगत व्यक्त केले.स्वागत ऋषिकेश कुलकर्णी यांनी केले,प्रास्ताविक नितीश दुबे यांनी केले. आभार जब्बार मिस्त्री यांनी मानले.