सांगलीसह विविध ठिकाणी उद्योगपती सी.आर.सांगलीकर साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती : अनेकांनी दिल्या शुभेच्छा

सांगली : दिलदार व्यक्तिमत्व, उद्योगपती मा सी.आर.सांगलीकर साहेब यांचा वाढदिवस मिरज आणि सांगली सह विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. काही लोकांनी प्रत्यक्षपणे तर काहींनी फोन द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ तालुक्यातही उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब यांचे शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते.
उद्योगपती मा सी आर सांगलीकर साहेब यांचा वाढदिवस सकाळी मिरज येथे तर सायंकाळी सांगली येथील सी आर सांगलीकर फौंडेशन येथे साजरा करण्यात आला. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकांचे उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब यांनी स्वागत केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दिनकर पाटील माजी सभापती मार्केट कमिटी,
तानाजी पाटील माजी सरपंच सलगरे, सुरेश कोळेकर मा. डेप्युटी सरपंच सलगरे, संजय (बापू) विभूते, जिल्हाध्यक्ष शिवसेना, सुभाष दादा पाटील, माजी.पंचायती समिती सभापती, भंते डॉ यशकाशपायन महाथेरो, जयसिंगपूर, भंते गोवींदो मानदो, बीड., भिमशक्तीचे सिद्धार्थ माने, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वाढदिवसाचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते.