महाराष्ट्रसामाजिक
चितळे उद्योग समूहाकडून मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटींचे दान


दर्पण न्यूज मुंबई:— महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि महापूरामुळे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेऊन चितळे उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटींचे सहवेदना दान दिले.
ही मदत मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी श्रीपाद चितळे, विश्वास चितळे ,गिरीश चितळे आणि निखिल चितळे उपस्थित होते.
याच वेळी चितळे उद्योग समूहाचे संचालक . गिरीश चितळे यांनी “काकासाहेब चितळे : सहवेदनेतून समृद्धीकडे” हे प्रेरणादायी पुस्तक . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिले.
चितळे समूहाने सामाजिक जबाबदारीचे भान राखत संकटग्रस्त नागरिकांसाठी दिलेली ही मदत आणि त्यांचा “सहवेदनेतून समृद्धीकडे” हा दृष्टिकोन समाजासाठी आदर्श ठरावा अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.


