आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज 31 जानेवारीपर्यंत सादर करावे : संशोधन अधिकारी जयंत चाचरकर

 

सांगली : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज करतेवेळी जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका तृतीय वर्षात शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज शैक्षणिक संस्थेच्या शिफारसीसह दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत समिती कार्यालयाकडे सादर करावेत. शैक्षणिक संस्थांनाही विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून समितीकडे मुदतीत अर्ज सादर करण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी जयंत चाचरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

अर्जदारांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा. महाविद्यालयीन शिफारसपत्र, 15A फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या साक्षांकित प्रतींसह समितीकडे सादर करावी. अर्ज सादर करतेवेळी अर्जदार / पालक यांनी समक्ष मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!