क्राईम

धामोङ येथे मुलीच्या विनयभंग प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना मारहाण

 

कोल्हापूरः अनिल पाटील

धामोड ता राधानगरी येथे कॉलेजला आलेल्या मुलीला भरधाव वेगाने घासून मोटरसायकल चालवुन व तिला लग्नासाठी भिती दाखवली . मुलिने घडलेला प्रकार घरी सांगीतल्यावर जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या घरच्यांना मारहाण केल्या प्रकरणी राधानगरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे .
पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार
धामोड येथे कॉलेज सुटल्यानंतर संबंधीत मुलीला प्राईम हॉटेल समोर कोते पैकी मानेवाडी येथील वैभव सावंत व दिपक सावंत यांनी मोटरसायक घासून मारत संबंधित मुलीचा पाठलाग करत आड वाटेत अडवून तिला लग्नाचा तगादा लावत त्रास दिला . याबबत संबंधित मुलिने घडलेला प्रकार घरी सांगीतला . याचा जाब मुलिच्या चुलत्याने विचारला असता त्याला संशयीत आरोपिंनी कु-हाडी ने मारहाण केली . संबंधित मुलगी अल्पवयीन असुन याबबत मुलीच्या आईने राधानगरी पोलीसात तक्रार केली आहे . संबंधित आरोपींवर भा द वी क्र 354 , 354 ( ड ) , 324, 34 , व पोक्सो 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पो नी इश्वर ओमासे करत आहेत .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!