महाराष्ट्र

धनगांव येथे मान्यवरांचा सत्कार, पुस्तकाच प्रकाशन, गुणवंतांचा गौरव, विविध विकासकामांचा धूमधडाका : आमदार डॉ विश्वजीत कदम यांची उपस्थिती

लोकनेते जे के बापू जाधव, महेंद्र आप्पा लाड आदींचा सत्कार : ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील धनगांव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने विविध पदांवर निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा, विद्येच्या प्रांगणात या आत्मकथन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व धनगांवमधील विविध विकास कामांचा शुभारंभ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
धनगाव गावचे विद्यमान सरपंच सतपाल (काका) साळुंखे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती पलूसच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल तसेच महिंद्र (आप्पा) लाड यांची रयत शिक्षण संस्था साताऱ्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर पाच विद्यापीठांचे कुलगुरू पद भूषविलेले ज्ञान यात्री व धनगावचे सुपुत्र डॉक्टर माणिकराव साळुंखे यांचा भव्य असा सत्कार आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर जे.के (बापू) जाधव, संजय (दादा) पवार, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे,अनिल साळुंखे, प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार, शामराव साळुंखे, सौ मनीषा मोहिते, कृष्णदेव तावदर, मोनिका साळुंखे, आनंदी जाधव त्यांच्यासह पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक,, धनगाव येथील सर्व गुणवंत विद्यार्थी, यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,रोप, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.दरम्यान
धनगावचे सुपुत्र, पाच विद्यापीठांचे कुलगुरुपद भूषविलेले ज्ञानयात्री डॉ.माणिकराव साळुंखे लिखित
विद्येच्या प्रांगणात या आत्मचरित्राचे प्रकाशन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले.


तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीस आमदार डॉ विश्वजीत कदम यांचे विचारमंचाकडे आगमन होत असताना, उपस्थितांनी उभे राहून, टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले तर सतपाल (काका) साळुंखे यांनी
आमदार डॉ.विश्वजीत कदम यांचा शाल, पुष्पगुच्छ व रोप देवून स्वागतपर सत्कार केला.संदिप यादव यांनी मनोगत व्यक्त केले तर रविंद्र साळुंखे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.रुपेश हिरुगडे यांनी आभार मानले.यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पलूस तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!