महाराष्ट्र

राधानगरी ग्रामपंचायत येथे वणवे टाळा, जंगल वाचवा या संदेशासहित केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर कार्यालयातर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा

कोल्हापूर :-

 

वणवे टाळा जंगल वाचवा असा संदेश केंद्रीय संचार ब्युरोचे कोल्हापूर कार्यालयातर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात देण्यात आला. राधानगरी ग्रामपंचायत आणि उपवन संरक्षक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राधानगरी ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी वन खात्याचे बलेश न्हावी, विश्वास पाटील तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने काल तीन जून रोजी घेण्यात आलेल्या चित्रकला तसेच रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी उपस्थितांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.

यावेळी राधानगरी वन खाते तसेच केंद्रीय संचार ब्युरोच्या कर्मचाऱ्यांनी कुंभारवाडी, धामोड, राशीवडे, सूळगाव, आजरा, पेर्नोली, देवकंडगाव,गवसे, चव्हाणवाडी आदी गावांमध्ये जंगलाचे संवर्धन तसेच वणव्याची समस्या आदी विषयांवर समूह चर्चा केली.

दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जाणारा जागतिक पर्यावरण दिन हा एक महत्त्वपूर्ण जागतिक कार्यक्रम आहे जो व्यक्ती, समुदाय आणि शासकीय संस्थांना आपल्या पृथ्वीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दिशेने विचार करण्यास आणि कृती करण्यास प्रोत्साहित करतो. हा दिवस हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण आणि जैवविविधतेचा ऱ्हास यासारख्या पर्यावरणीय समस्यांकडे लक्ष देण्याची आठवण करून देतो.

एकत्र येण्याची, जनजागृती करण्याची आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याची ही संधी साधण्यासाठी  केंद्रीय संचार ब्युरोच्या कोल्हापूर कार्यालयाने हा पर्यावरण संवर्धनाचा विशेष प्रसिद्धी अभियानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

राधानगरी आजरा आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून हा भाग वणव्याच्या समस्येशी लढत आहे. जंगलांना लागलेल्या आगीमुळे अधिवास नष्ट होतात, असंख्य प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होतात. आपल्या परिसंस्थांचे रक्षण करण्यासाठी, जैवविविधतेचे जतन करण्यासाठी आणि हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी जंगलातील आग रोखणे आणि प्रभावी अग्निशामक धोरणांची अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. त्यासोबतच लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट (LiFE) मोहिमेविषयी देखील  जनजागृती करण्यात आली.

लाईफची कल्पना पंतप्रधानांनी सीओपी २६ मध्ये मांडली होती. आपल्या ग्रहाशी सुसंगत जीवनशैली जगण्याचे हे अभियान आवाहन करते. अशी जीवनशैली जगणाऱ्यांना “ग्रहा-भिमुख लोक म्हणले जाते. मिशन एलआयएफई भूतकाळातून अनुभव घेते, वर्तमानात कार्य करते आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करते. संसाधनांचा कमी वापर करणे आणि पुनर्वापर करणे या संकल्पना आपल्या जीवनाचा भाग बनल्या पाहिजेत . चक्राकार अर्थव्यवस्था आपल्या संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!