पलूस येथे ट्रेन्डस शोरुमचे शानदार उदघाटन
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष,तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांची उपस्थिती

पलूस प्रतिनिधी :-
बलवडी येथील दत्तात्रय गायकवाड यानी स्वमालकीच्या जागेत बांधलेल्या आणि रिलायन्स उद्योग समुहाकडुन संचलीत होणार असलेल्या कपड्यांचा जागतिक ब्रॅन्ड ट्रेन्डस या शोरुमचा शुभारंभ पलूसमध्ये रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.येथील कराड तासगाव मुख्य रस्त्यावर भव्य तीन मजली तयार कपड्यांचे दालन सुरु झाल्याने ब्रॅन्डेड कपडे खरेदी करणेसाठी सांगली कोल्हापुरला जाणार्या ग्रहकांची सोय आता आपल्या पलूस शहरातच झाल्याने ग्राहकवर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.या ट्रेन्डस शोरुममध्ये लहान मुले,महिला वर्ग आणि पुरुषवर्ग यांचेसाठी सर्व प्रकारचे तयार कपडे रास्त दरांत उपलब्ध करुन देणेत आले आहेत.संपुर्ण वातानुकुलीत असणार्या या शोरुममध्ये आपुलकीची सेवा देणेसाठी कंपनीकडुन प्रशिक्षीत कर्मचारी वर्गाची नेमणुक करणेत आली आहे.या शुभारंभासाठी पलूस नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विशाल दळवी,संदीप सिसाळ,सुहास पुदाले,निलेश येसुगडे,कपील गायकवाड
या वस्तूचे मालक दत्तात्रय गायकवाड, उद्योजक विलास शेठ पवार, डॉ. पतंगराव कदम विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोक लाड ,मार्केट कमिटीचे संचालक शशिकांत पवार, विक्रम लाड पलूसचे नगरसेवक नितीन जाधव पत्रकार श्रीकृष्ण आवटे, धनंजय दौंडे , हारूण मगदूम , उपस्थित होते.यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी,राजकीय कार्यकर्ते,व्यापारी आणि गायकवाड कुटुंबीय मोठ्या संस्थेने उपस्थित होते.