महाराष्ट्र

मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँकेकडून रौप्यमहोत्सवानिमित्त भेट वस्तूंचे वाटप : लोकनेते मा. जे. के. बापू जाधव यांची उपस्थिती

चेअरमन सुधीर भैय्या जाधव यांच्या कार्यावर सभासद खूश

 

दुधोंडी (प्रतिनिधी) :- दुधोंडी येथील मानसिंग को- ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मा. जे. के. बापू जाधव यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी बॅंकेचे चेअरमन सुधीर भैय्या जाधव म्हणाले, “मानसिंग बॅंकेने सभासदांच्या विश्वासावर रौप्यमहोत्सवी वर्षापर्यंत वाटचाल पूर्ण केली आहे. कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवेमुळे आणि सुयोग्य व्यवस्थापनामुळे बॅंक यशस्वीपणे कार्यरत आहे.
मा. जे. के. बापू जाधव यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली बॅकेचा लौकीक महाराष्ट्रभर पोहोचला आहे. बँकेच्या या यशामध्ये हितचिंतकांचा आणि सभासदांचा मोलाचा वाटा आहे. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून रौप्यमहोत्सवानिमित्त बॅंकेकडून भेटवस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. तरी सभासदांनी केवायसी पूर्ण करून आपल्या नजिकच्या शाखेतून भेटवस्तू न्याव्यात” असे आव्हान यावेळी सुधीर भैय्या जाधव यांच्यावतीने करण्यात आले.

 


यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी मीनाक्षीदेवी जे के बापू जाधव क्रेडिट सोसायटीचे संस्थापक क्रांतीकुमार जाधव, येळावीचे दिनकर पाटील, विसापूर डी ए माने, अंकलखोप चे उद्योजक गजानन चौगुले, वैभव यादव, अभिजित रांजणे, विश्वास जाधव, आमरापुरचे मोहन पवार, विठ्ठल मोरे, नागराळे यशवंत बाबर, माजी सरपंच विजय आरबूने, मिलिंद जाधव, अमीन पठाण, अशोक पाटील, मारुती सुतार, आक्तर पीरजादे, पुणदीचे अशोक जाधव, माजी उपसरपंच नागनाथ साळुंखे, मानसिंग बँकेचे संचालक सतीश धनवडे, हनिफ मुजावर, अजित सूर्यवंशी, अनिल शेवाळे, सुरेश रानमाळे, संदीप पाटील, जोतिराम साळुंखे, प्रशांत चव्हाण, संजय भोसले, रामचंद्र जाधव, सदाशिव कदम, आनंदराव कदम, भीमराव कदम, मानसिंग बँकेचे जनरल मॅनेजर संभाजी जाधव, मॅनेजर हणमंत महाडीक, शाखाधिकारी प्रकाश आरबूने, गणेश जाधव, बाबासो जाधव, राजेश नेने, अभिजित कत्ते, मधुकर धनवडे, शांताराम साळुंखे, तसेच बॅंकेचे संचालक, सभासद, हितचिंतक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!