मालोजीराजे छत्रपती यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन’च्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड

कोल्हापूर ः अनिल पाटील
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई यांची सन २०२३ ते २०२७ या चार वर्षाकरिता कार्यकारिणी मंडळासाठीची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये अध्यक्ष, पाच उपाध्यक्ष, एक सचिव, तीन सहसचिव, एक कोषाध्यक्ष व १३ कार्यकारी समिती सदस्य यांची निवड दि. २८ ऑक्टोबर, २०२३ रोजी करणेत आली. श्री. प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्ष म्हणून निवड तर उपाध्यक्ष म्हणून श्री. मालोजीराजे छत्रपती, श्री. सुनिल धांडे, श्री. विश्वजीत कदम, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. हरिष वोरा यांची निवड झाली. यामध्ये कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करणारे श्री मालोजीराजे छत्रपती यांची उपाध्यक्षपदी सलग पाचव्यांदा निवड झालेली आहे.
मालोजीराजे छत्रपती हे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष असून ते राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहेत. महाराष्ट्रातील फुटबॉल क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची विशेष नोंद घेऊन ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समीतीवर सदस्य म्हणून सलग दुसऱ्यांदा त्यांची नुकतीच निवड झालेली आहे. कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रास आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणेसाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सूरू आहेत. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा, विविध सेमिनार यांचे आयोजन त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे कोल्हापूर येथे केले गेले आहेत. कोल्हापूरातील खेळाडू व प्रशिक्षकांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणेसाठी त्यांनी अनेक संधी निर्माण केल्या आहेत.
के. एस. ए. चे पेटून- इन्- चीफू शाहू छत्रपती महाराज यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले
मालोजीराजे छत्रपती यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.