महाराष्ट्रराजकीय
कडेगाव शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांची उपस्थिती

कडेगांव: पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव शहरातील भाजपचे कार्यकर्ते राजेंद्र आबासाहेब देशमुख, प्रताप आबासाहेब देशमुख, विलासराव आबासाहेब देशमुख यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व नेतृत्वावर विश्वास ठेवून कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, या सर्व कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या सर्व कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चितच पक्षाला आणि माझ्या विजयाला बळ देणारा आहे.
यावेळी शांतारामबापू कदम, कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाशराव जाधव यांच्यासह कडेगाव शहरातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.