सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
वाचन प्रेरणा दिवसामुळे सलग पाच तास वाचन उपक्रम : उद्योगपती गिरीश चितळे यांची उपस्थिती

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे पंधरा ऑक्टोबर 2024 रोजी माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली .
यानिमित्ताने वाचन प्रेरणा दिवसाचे अवचित्य साधून सलग पाच तास वाचन उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी अध्यक्ष गिरीश चितळे यांचे हस्ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सलग पाच तास वाचन उपक्रमाचा शुभारंभ गिरीश चितळे यांनी वाचन करून केला. यावेळी भिलवडी आणि परिसरातील 45 वाचकांनी सलग पाच तास वाचन उपक्रमात सहभाग नोंदविला. यामध्ये महिला वाचकांची संख्या देखील लक्षणीय होती .
स्वागत प्रास्ताविक सुभाष कवडे यांनी केले तर जयंत केळकर यांनी आभार मानले. सुभाष कवडे यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या वाचन कार्याविषयी विस्ताराने माहिती दिली या कार्यक्रमाचे संयोजन कार्यवाह सुभाष कवडे संचालक जयंत केळकर ग्रंथपाल वामन काटेकर सौ विद्या निकम सौ मयुरी नलवडे माधव काटेकर यांच्यासह उपस्थित वाचकांनी केले सलग पाच तास वाचन या उपक्रमात वाचकांनी कथा कविता कादंबरी इतिहास पर्यावरण अशा विविध विषयांच्या पुस्तकांचे वाचन केले.