सार्वजनिक वाचनालय भिलवडीच्या 57 व्या वाचन कट्ट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने दर महिन्याच्या एक तारखेस संपन्न होणारा वाचन कट्टा उपक्रम नुकताच संपन्न झाला. हा 57 वा वाचन कट्टा संपन्न झाला या वाचन कट्ट्याच्या अध्यक्षस्थानी माननीय गिरीश चितळे होते. श्रावण सरी या विषयावरती हा वाचन कट्टा संपन्न झाला प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली वाचनालयाचे कार्यवाहक व वाचन कट्टा उपक्रमाचे संयोजक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून विस्ताराने वाचन कट्टा उपक्रमाची माहिती दिली यावेळी अनेक वाचकांनी श्रावणाच्या कविता ललित लेख श्रावणातील निसर्ग श्रावणातील आध्यात्मिक वातावरण सण आधी बाबतींचा आढावा घेणारे लेख कविता सादर केल्या सुभाष कवडे यांनी हरवलेला श्रावण हा लेख सादर केला श्रीयुत ज. कृ. केळकर सौभाग्यवती उर्मिला दिसले वहिनी मयुरी नलवडे श्री रमेश चोपडे जी जी पाटील हनुमंतराव दिसले प्रमोद कुलकर्णी यांनी श्रावणाच्या कविता सादर केल्या उत्तम कांबळे मेजर यांनी त्यांच्या आत्मकथनाचा दहावा भाग वाचून दाखवला गिरीश चितळे यांनी जी पी टी या तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करून श्रावण महिन्याची कविता सादर केली हकीम तांबोळी सर यांनी श्रावण मनभावन हा लेख तर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे श्री शिंदे यांनी श्रावण सणांचा राजा या लेखांचे वाचन केले यावेळी वाचनालयाचे सभासद वाचक बहुसंख्येने उपस्थित होते. डी आर कदम सर यांनी आभार मानले एक आक्टोबर 2024 रोजी संपन्न होणाऱ्या वाचन कट्ट्यासाठी ग दि माडगूळकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ग दि माडगूळकर यांचे साहित्य या विषयावर 58वा वाचन कट्टा एक ऑक्टोबर रोजी संपन्न होईल असे कार्यवाह सुभाष कवडे यांनी जाहीर केले. यावेळी गिरीश चितळे यांनी वाचनालयास मातृ प्रेरणा या दहा अंकांची भेट वाचनालयास दिली श्री महादेव सगरे सहकार्यवाह भारती विद्यापीठ पुणे यांनी वाचनालयास महाराष्ट्राचे शिल्पकार डॉक्टर पतंगरावजी कदम या पुस्तकाच्या चार प्रती भेट दिल्या श्री बी डी पाटील सर यांनी या पुस्तकाच्या प्रती वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांचे कडे सुपूर्त केल्या श्री सगरे सर यांनी डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांचे चरित्र युवकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे सर्व सभासदांच्या पर्यंत आम्ही हे पुस्तक पोहोचविणार आहोत असे गिरीश चितळे यांनी यावेळी सांगितले.